मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासासाठी घरी पाठवा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्रातील परिस्थिती व समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. तरी त्यांचा अभ्यास कच्चाच आहे. त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी कायमचे घरी पाठवा. मतदार संघाचे प्रतिनिधी पालकमंत्री असताना नागरिकांना रास्तारोको करण्याची वेळ येते ही दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्र्यांसह व सरकारवर टिका केली.
Loading...

विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन
नगर-सोलापुर महामार्गावर तालुक्‍यातील माहीजळगाव येथे रास्तारोको आंदोलनादरम्यान ते बोलत होते. कर्जत तालुका कॉंग्रेसतर्फे कर्जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, पाण्याचे टॅंकर त्वरित सुरु करावेत, जनावरांना दावनीवर चाऱ्याचा पुरवठा करण्यात यावा, कुकडीतून सीना धरणात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा 
तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. आंदोलनामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. आंदोलनात कॉंग्रेस तसेच मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.