नगर दक्षिण जिल्ह्याचे विभाजन करून दुष्काळ जाहीर करा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, हाताला काम द्यावे, लोडशेडिंग बंद करावे, बोंडअळी ग्रस्त कापसाची नुकसान भरपाई मिळावी, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा, पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांनाच्या खात्यावर जमा कराव्यात आशा घोषणाबाजी करत राष्ट्रवादीचे नेते अॅड प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वा संस्कार भवन मोर्चाला सुरवात झाली.

Loading...
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवशंकर राजळे, बाळासाहेब ताठे, नगरसेवक बंडूपाटील बोरुडे महेश बोरूडे, रामराव चव्हाण, शितारामबापु बोरूडे, बाळासाहेब दराडे, डाॅ राजेंद्र खेडकर, देवा पवार, योगेश रासने, स्वप्नील देशमुख, भगवतसंग देवढे, आदी मोर्चात सहभागी झाले होते

मोर्चा नवी पेठ मार्गे तहसील कार्यालयावर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले या बोलताना अॅड ढाकणे म्हणाले की सध्या पाथर्डी तालुक्यात 72 साला पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे विहीरी आतापासूनच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांची व जनावरांना चारा व पाणी मिळण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा वेळी सरकारने तातडीने परिस्थिती लक्षात घेऊन यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.