त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोपरगाव शहरातील हॉटेल न्यू सागरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात एक महिला गंभीर जखमी झाली होती. आज (दि.25) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोपरगाव शहरातील खंदकनाला येथील मेन रोड लगत हुरखॉं बसीरखॉं पठाण यांच्या मालकीच्या हॉटेल न्यू सागरला बुधवारी (दि. 24) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती. 
Loading...

त्यात हॉटेलमध्ये काम करणारी शारदा नंदू मोरे (वय 45,रा. साईबाबा तपोभूमी) ही महिला 90 टक्के भाजली होती. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. या महिले पश्‍चात पती, दोन मुले, असा पारीवार आहे. मयत शारदा मोरे या नव्यानेच कामावर रुजू झाल्या होत्या. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.