खुशखबर ! नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार ...


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या सुरु असलेल्या कामाबाबत खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकारातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूर प्रांताधिकारी संजय अस्वले रेल्वे बोर्डाचे आर.एन.गुप्ता व दौंड तहसीलदार यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. 
Loading...

नगर पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास ९० टक्के जमिनींचे भूसंपादन झाले आहे उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतकऱ्यांचा अडचणी आणि तक्रारी होत्या त्यांच्या समवेत यावेळी यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला त्यामुळे आता लवकरच नगर पुणे रेल्वे कॉड लाईनचे सुरु असलेले काम पूर्ण होणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी यावेळी सांगितले.

या कॉड लाईन मुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. जवळपास दीड ते दोन तासांत आता पुण्याला जाणे शक्य होणार असल्याने नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. परिणामी याचा परिणाम नगर पुणे रस्त्यावरील रहदारीवरही होणार असल्याने अपघांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल असे मत खासदार दिलीप गांधी व्यक्त केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.