श्रीरामपुरात वृद्ध वडिलांचा दगडाने ठेचून खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरी जाऊन तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास तिच्या आई-वडिलांनी विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने तिच्या वडिलांचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना खंडाळा येथे बुधवारी सायंकाळी घडली. गुरुवारी दुपारी पाच जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
कासम नवाब सय्यद (६३) असे मृताचे नाव आहे. सत्तार शहा हा मुलीची छेड काढत होता. हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांनी पाहिला व आरोपीस विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने कासम सय्यद यांना मारहाण केली. जवळच पडलेला दगड उचलून त्याने कासम यांच्या छातीवर मारला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या आईसही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

कासम सय्यद यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन सत्तार सुलेमान शहा, शकील सत्तार शहा, हालिमा सुलेमान शहा, रिजवान रज्जाक शहा, सुलेमान शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.