श्रीगोंद्यात शाळकरी मुलीची छेड काढून जीवे मारण्याची धमकी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शाळेत जाणार्या मुलीची छेड काढून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिरोज इनामदार (पिंपळेवस्ती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
संबंधित मुलगी शाळेत जात असताना २२ रोजी सकाळी इनामदार याने मोटारसायकल आडवी घालून 'तू मला खूप आवडतेस, तुला नवा मोबाइल घेऊन देतो. त्यावरून तू माझ्याशी दररोज बोल. याबाबत घरच्यांना सांगितले, तर तुझ्यासह घरच्यांना जीवे मारेन', अशी धमकी त्याने दिली होती. 

तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, असे म्हणत त्या मुलीने हात हिसकावून शाळेत पळ काढला. त्यानंतर दोन दिवसांनी नातेवाईकांच्या समवेत येऊन श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली. बालकांचे लैगिक शोषण करण्यापासून संरक्षण कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अजूनही अटक करण्यात आलेली नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.