पालकमंत्री राम शिंदेंवर शेतकरी नाराज.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील दुष्काळसदृश भागाची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री राम शिंदे यांनी केवळ एका भाजप कार्यकर्त्याच्याच शेतातील कपाशीची पाहणी केली. उपस्थित अन्य शेतकऱ्यांशी कुठलाही संवाद न साधता ते सरळ पाथर्डीकडे रवाना झाल्याने मंत्रिमहोदयांना भाजपच्या लोकांचाच दुष्काळ दिसला का, असे म्हणत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


Loading...
पाच मिनिटांत दुष्काळ कसा दिसला? 
मढीचा दौरा रद्द पालकमंत्री राम शिंदे यांचा मढी येथील दौरा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांना दुष्काळ पाच मिनिटांत कसा दिसला, असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांमधून विचारला गेला.

शेतकऱ्यांची तीव्र शब्दांत नाराजी
पालकमंत्री येणार म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. मात्र, मंत्री महोदयांनी पाचच मिनिटांत पीक पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी दुष्काळग्रस्त परिस्थितीविषयी कुठल्याही प्रकारचा संवाद न साधताच ते पाथर्डीकडे रवाना झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

दुष्काळ भाजप कार्यकर्त्याच्याच शेतात ?

पाथर्डी तालुक्याच्या दृष्काळग्रस्त भागाची पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी दौऱ्यावर आलेले मंत्री राम शिंदे सरळ निंबोडीफाटा येथील भाजपचे तालुका चिटणीस राहुल कारखेले यांच्या शेतात गेले. कपाशीच्या पिकाची पावसाअभावी खुंटलेली वाढ, तसेच कपाशीच्या झाडाला किती बोंड आहेत याची पाहणी त्यांनी केली. 

मुळात मंत्री शिंदे हे मच्छिंद्र भापसे यांच्या शेतातील पिकांची पाहणी करणार होते. तसे नियोजन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आदल्या दिवशी करण्यात आले होते. परंतु महामार्गापासून भापसे यांची शेती पाचशे फुटांवर असल्याने एेनवेळेस भापसे यांच्याऐवजी महामार्गाच्या एकदम कडेला असलेल्या कारखेले यांच्या शेतातील पिकाची पाहणी त्यांनी केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.