सरकार आम्हाला शेती करायला शिकवणार का? - विखे पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  १६ हजार कोटी वापरून सरकारने जी जलयुक्त शिवार योजना सुरू केली त्याचा सर्वसामान्याना काही फायदा झाला नाही, ही तर झोलयुक्त शिवार योजना आहे. आमचे संपूर्ण घराणे शेती करण्यात गेले. त्यामुळे आताचे सरकार आम्हाला शेती करायला शिकवणार का? असा सवाल विखे पाटलांनी केला आहे.
Loading...

राज्यभर दुष्काळ दिसत असताना सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट बघत होते. १८० तालुक्यांमध्ये राज्य सरकारने उशीराने का होईना पण दुष्काळ जाहीर केला. त्यात सरकारने दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. सरकारचे नेमके आर्थिक निकष काय आहेत? असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.