एस.टी.खाली आलेल्या मृत तरुणाची ओळख पटेना


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-औरंगाबाद राजमार्गावर मनीष पेट्रोल पंपासमोर सांगली डेपोच्या एस.टी.बस खाली जखमी पादचारी तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही.
Loading...


सोमवार २२ ऑक्टोबरचे सायंकाळी ७.३० वाजता नगर-औरंगाबाद राज्यमार्गावरून सांगली डेपोची एस.टी.बस जात असताना घोडेगाव येथील मनिषा पेट्रोलपंपासमोर एक रस्त्याने जाणारा तरुण अचानक बसखाली आला. त्याला नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर हा तरुण मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनई पोलीस ठाण्याला कळविलेनुसार अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ३७ दाखल करण्यात आला. 

पुढील तपास चालू आहे. मात्र, या तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नसल्याने मृतदेह नेवासा ग्रामीण रुग्णालयात ओळख पटविणे कामी ठेवलेला आहे. मृत तरूणाचे वय अंदाजे २६ ते २७ वर्षांचे असून त्याने जीन्स पॅन्ट व चॉकलेटी हाफ शर्ट परिधान केलेला आहे. तरी या वर्णनाचा कुणी तरूणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास सोनई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार गोल्हार यांनी केले आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.