.....आणि 'त्या' महिलेच्या संसारात पुन्हा आनंद फुलला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आजच्या युगात महिलाच्या छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. महिला तसेच तिच्या सासरचे उच्चशिक्षित असले तरी काही घरगुती कारणामुळे संसाराचा गाडा बिघडण्यास वेळ लागत नाही. अशाप्रकारे उत्तरप्रदेशमधील एक मोडणारा संसार शिर्डीतील साईआश्रयामुळे पुन्हा उभा राहण्यास मदत झाली आहे. 


एक उच्चशिक्षित तरूण महिलेची सासरशी ताटातुट न होता पुन्हा संसाराचा वेल पुढे वाढण्यास मदत झाली आहे.. त्याचे असे घडले उत्तर प्रदेश राज्यातील मशुरा येथील उच्चशिक्षित असलेली विवाहिता असून तिचे पती अभियंता आहे. देवाने या दाम्पत्यास दोन मुले दिली. 

Loading...

माहेरची परिस्थीती अत्यंत गरिबी. गेल्या अकरा वर्षांपासून या विवाहितेस सासरकडील मंडळी त्रास देत, नातेवाईकांशी बोलू देत नव्हते, माहेरी जाऊ देत नव्हते. या त्रासाला कंटाळून सदर महिला शिर्डीत आली. आत्महत्या करण्याचा विचार मनात खोळत होता. 


मात्र, आपल्या दोन चिमुकल्यांची काळजी तिला लागली होती. एका रिक्षा चालकास मला साईआश्रय आश्रमात जायचे आहे, असे सांगितले. रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे या हताश झालेल्या महिलेस आश्रमात आणून सोडले. आश्रमाचे चालक गणेश दळवी यांनी या महिलेची करूण काहाणी ऐकून घेत तिला धिर दिला. 


पंधरा दिवस तुम्ही या आश्रमात रहा, येथील मुलांशी गप्पा मारा त्यांना शिकवा असे सांगितले. सदर महिला या मुलांसमवेत आश्रमात रमुन गेली. आश्रमातील मुली तसेच दळवी कुटुंबातील महिला सोबत सदर विवाहिता राहू लागली. तिला आपल्या कुटुंबात कसे रहायचे, मुले तसेच सासरकडील मंडळी यांच्याशी कसे वर्तन करायचे, प्रत्येक घरात छोट्या छोट्या कुरबुरी चालू असतात. 

Loading...

राग हा दोन दिवसांचा असतो. काही दिवसांत तो शांत होतो. सासरच्या लोकांचा राग शांत होईल, पुन्हा ते नेण्यास येतील, असे समजावत तिला साईबाबांचे आशिर्वाद पाठीशी असल्याने तुमचे भविष्य चांगले आहे, असे सांगितले. तुम्हाला सासू, सासरे, मुले आहेत. तुम्हाला सासरी सन्मानाने पाठवू, उर्वरित आयुष्य आनंदाने रहावे असे सुचित केले. मात्र, या महिलेच्या मनात सासर कडील मंडळींची भिती असल्याने तिची समजूत काढण्यात आली. आपण जणू माहेरीच आलो आहोत अशी भावना या महिलेच्या मनात तयार झाली. 


या महिलेसंदर्भात माहेरकडील मंडळींना मोबाइलद्वारे माहिती देण्यात आली. मात्र, ते घाबरलेले असल्याने अखेर सासरच्या मंडळीशी संपर्क करुन त्यांना सदर महिला साईआश्रयात असल्याची माहिती दिली. सासरकडील मंडळीनी आपल्या मुलाची चूक कबुल करत यापुढे सुनेस त्रास देणार, अशी ग्वाही साईबाबांच्या नगरीत दिली. 


आश्रमातून जाताना या महिलेचे डोळे अक्षरश: पाणावले होते. सासरच्या मंडळींनी आपल्या सुनेस पुन्हा सासरी घेऊन गेले. आश्रयाचे गणेश दळवी, त्यांची आई, पत्नी यांच्या प्रयत्नामुळे एक सुशिक्षित घराण्यातील कुटुंबाचा संसाराचा पुन्हा आनंदाने फुलला आहे. 


दळवी यांनी शंभरहुन अधिक निराधार मुलांना आपल्या कवेत घेऊन त्यांचे संगोपन व शिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळत आहे. एका सामान्य परिवारातील तरूणाने मोठे धाडस केले असून त्यांना समाजातील दानशुर व्यक्तींची मदत तसेच कुटुंबाचे मोठे पाठबळ मिळत आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.