अहमदनगर ‘मनसे’वर उमेदवार शोधण्याची वेळ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिग्गजांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने व इच्छुकांची संख्याही कमी असल्याने या निवडणुकीत मनसेवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी असताना, त्या तुलनेत मनसेच्या गोटात कमालीची शांतता आहे. 
Loading...

मनसेचे शहरातील अस्तित्व कमी होत असल्याचे चित्र आहे. स्वबळाचा नारा दिलेल्या ‘मनसे’वर या निवडणुकीत उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. डिसेंबर महिन्यात मनपाची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीवरून मतभिन्नता आहे. 

या चारही पक्षांनी ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. मनपा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना, मागील आठवड्यातील बैठक वगळता मनसेकडून निवडणुकीसंदर्भात काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. या बैठकीत शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी मनसे सर्व जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. 

मात्र पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांना तिकीट देण्यास विरोध दर्शविला आहे तसेच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी पक्षाने अद्याप निरीक्षकही नियुक्त केले नाहीत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये शांतता पसरलेली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.