शेतीच्या वादातून खून करणाऱ्या दोघांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतीच्या वादातून अपहरण करून हत्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाथर्डीतील आडगाव येथील या हत्येचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे. चंद्रकांत आनंदा बर्फे (वय 52) व त्याचा मुलगा अमोल (वय 20, दोघे रा. आडगाव, पाथर्डी) या दोघांना अटक केली आहे. 


Loading...
राजू रभाजी शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तक्रार राजू यांचे बंधू अशोक यांची यात हत्या झाली आहे. शेंडे आणि बर्फे यांची शेतीवरून सतत वाद होत होते. अशोक शेंडे यांचे या वादातून चंद्रकांत बर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे व शिवाजी बर्फे या चौघांनी त्यांचे 11 ऑक्‍टोबरला अपहरण केले होते. 

यानंतर अशोक शेंडे यांचा मृतदेह धारवाडी-लोहसर रोडवर सापडला होता. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तो विद्रूप करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करत चंद्रकांत बर्फे व त्याचा मुलगा अमोल याला पिंपरी (ता. पुणे) येथून अटक केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.