अहमदनगर शहरातील जनता शिवसेनेच्याच पाठीशी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यापासूनच नगरमध्ये अनेक विकासकामे झाली आहेत. त्याचप्रमाणे राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने अमृत आणि भुयारी गटारसारखे प्रकल्प मंजूर करुन आणले. त्यामुळे शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने मोठी चालना मिळाली आहे. 

Loading...
शिवसेनेने नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकांनी मोठे योगदान देत आपआपल्या भागात चांगली कामे केली आहेत. त्यामुळे पुढील काळात शहरातील जनता शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला.

आनंदऋषीजी हॉस्पिटलपासून माणिकनगर भागातील नितीन गुगळे घर ते अनिल दुगड यांच्या घरापर्यंत नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून होणार्‍या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, सुरेखा भोसले, मेहूल भंडारी, दत्ता जाधव, प्रा. पोपटराव काळे, शरद कोके, कैलास भोसले, धनराज गांधी, प्रदीप चंगेडिया, निवृत्ती झिने, सनी ताथेड, सतीश पारख, अरुण दुग्गड, अजय मुथा, संपत बाफना, महावीर मेहेर, संतोष बोगावत, ईश्वर धोका, अशोक पारख, सतीश डुंगरवाल, दिलीप वाघमारे, अभिषेक भोसले, अवधूत फुलसौंदर, ऋषभ भंडारी आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.