धक्कादायक !विवाहितेस डोळ्यात मिरची पूड टाकून, तोंडात औषध ओतून लाथाबुक्क्यांनी मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  २२ वर्षीय विवाहित महिलेस तिची जाव व भाया यांनी झाडूने मारहाण केली.डोळ्यात मिरची पूड टाकून तोंडात औषध ओतून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना खंडाळा ता.नगर येथे रविवारी (दि.२१) साडेसात वाजता घडली.
Loading...

सुवर्णा रविंद्र गव्हाणे (वय २२ रा. खंडाळा) हि महिला घरासमोरील पटांगणात झाडूने झाडत असतांना तेथे तिची जाव सुवर्णा बाबासाहेब गव्हाणे ही आली आणि काही एक कारण नसतांना तिच्या पाठीत झाडूने मारले.भाया बाबासाहेब याने तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. 


तिला खाली पाडून तिच्या तोंडात औषध ओतले आणि शिवीगळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.