ऊसतोडणी ठेकेदारास ३ महिने कैद व दंड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील कारेगाव भाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीशी ऊसतोडणी मजूर व वाहने पुरविण्याच्या कामासाठी घेतलेली ॲडव्हान्सची रक्कम वेळेत फेडू न शकल्याने  ठेकेदार भिमराव वालचंद चव्हाण (रा. नाईकनगर, डावरगाव) यास येथील 3 महिने कैदेची तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

चव्हाण यांनी सन २००४-०५ च्या गळित हंगामात मजूर व वाहने पुरविण्यासाठी ॲडव्हान्स रक्कम उचलली; मात्र ठरल्याप्रमाणे काम न केल्याने त्यांच्याकडील १६ हजार २०२ रुपयांच्या परतफेडीबाबत कंपनीने तगादा लावला असता दोन वर्षांनी त्याने त्या रकमेचा धनादेश कंपनीला दिला; मात्र तो वटला नाही.
Loading...कंपनीच्या वतीने जेठमल मेहेर यांनी श्रीरामपूर कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम १३८ अन्वये फौजदारी दावा दाखल केला होता. त्याच्या सुनावणीत जाब-जबाब, साक्षीपुरावे व विविध न्यायनिवाडे आदींच्या सादरीकरणानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्णय दिला आहे. दंडामधील २५ हजार रकमेपैकी ५ हजार रुपये न्यायालयास तर २० हजार फिर्यादी पक्षास द्यायची आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.