संततीसाठी दाम्पत्याचा लैंगिक छळ करणार्या भोंदूबाबाला सक्तमजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ठाणे शहरात मूल होत नाही म्हणून पीडित दाम्पत्याला स्वत: समक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर (४५) या भोंदूबाबाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

अत्यंत अघोरी कृत्याचा हा प्रकार वर्तकनगर येथे २०१६ मध्ये घडला होता. पीडित दाम्पत्याशी या भोंदूबाबाचे हे अश्लील चाळे तब्बल अडीच वर्षे सुरू होते. अखेर, शरीराशी लगट करू लागल्याने पतीचा विरोध न जुमानता पीडित महिलेने भोंदूबाबाची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात करताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. 
Loading...

संतती प्राप्ती होत नसल्याने हैराण दाम्पत्याने अखेर भोंदूबाबा योगेश कुपेकर याचा आसरा घेतला. कुपेकर याने पीडित दाम्पत्याला संतती प्राप्तीची हमी दिली. त्यांच्याकडून दहा हजार रुपयेही उकळले. दरम्यान, भोंदूबाबाने पती-पत्नीला त्याच्या समक्ष शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव पीडित दाम्पत्यासमोर ठेवला. याला पत्नीने विरोध केला. मात्र पतीच्या विश्वासाने अखेर ही घृणास्पद प्रक्रिया पार पडली. 

संततीप्राप्तीच्या नावाखाली घडलेल्या प्रकारचा धसकाच पत्नीने घेतला. अखेर पीडित दाम्पत्याने जुलै महिन्यात वर्तकनगर पोलीस ठाण्यात भोंदूबाबा योगेश कुपेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.