अहमदनगर - शिवसेनेकडून जनतेची दिशाभूल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर ते कल्याणरोड पर्यंतच्या लिंक रोडचे डांबरीकरण व मजबुती करण्याच्या कामासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होवून निधी मंजूर झालेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात एखाद्या नगरसेवकाच्या मागणीनुसार नव्हे तर आमदारांच्या शिफारशी व मागणीनुसार तरतुद केली जाते. 
Loading...

याची कुठलीही माहिती शिवसेनेच्या शहर प्रमुखास नसावी. त्यामुळेच त्यांनी नागरिकांची दिशाभूल करत थापा मारण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी केला आहे. 

शिवसेनेच्या शहर प्रमुखाने थापा मारून फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने गेल्या २५-३० वर्षात शहरात केवळ थापा मारूनच निवडणुका लढविल्या. पण आता ते दिवस गेले असल्याचेही प्रा.विधाते यांनी म्हटले आहे

याबाबत माहिती देतांना प्रा.विधाते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग २२२ ते नगर-पुणे महामार्गाला जोडणारा रस्ता असलेल्या लिंक रोडची अतिशय दुरावस्था झाल्याने व रस्ता जागोजागी खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने आ.संग्राम जगताप यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री व अर्थ मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. 

आ.जगताप यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे अंदाजपत्रक तयार करून अर्थ विभागाला सादर केले. त्यानुसार सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात लिंक रोडच्या डांबरीकरण व मजबुती करणासाठी एकूण ९५ लाख व 8४ हजार १५६ रुपये निधी मंजूर केला. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामास प्रारंभ होणार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.