प्रवरा डावा कालव्यात नवविवाहितेचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नवविवाहितेचा मृतदेह बुधवारी प्रवरा डावा कालव्यात आढळला. घरी सापडलेल्या पत्रावरून तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पूजा सुनील लहाटे (वय २६, वार्ड ३) असे मृत तरूणीचे नाव आहे. 

Loading...
सुनील लहाटे मूळचा शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील आहे. विवाहानंतर काही दिवसांनी दोघेही श्रीरामपूर येथे पूजाच्या वडिलांच्या घराजवळ रहावयास आले होते. दोन दिवसांपूर्वी पूजा घरातून बेपत्ता झाली. जीवनास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पत्र तिने लिहून ठेवले होते. 

बुधवारी सकाळी कारेगाव येथे कालव्यात पूजाचा मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला. कालवा निरीक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. पूजा ही सात महिन्यांची गरोदर असल्याचे त्यात स्पष्ट झाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.