गुन्हा दाखल होताच व्यंकटेश पतसंस्थेचे संचालक झाले फरार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनईतील श्रीव्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कर्मचारी, अध्यक्ष व संचालकांनी संगनमताने ठेवीदारांचे १ कोटी ९३ लाख हडप केल्याप्रकरणी लेखापाल सोमाणींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. त्यात फक्त कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात लेखापरीक्षक शिरीष देविदास कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

Loading...
सर्व आरोपी फरार आहेत. अध्यक्ष डॉ. सुनील बंग, उपाध्यक्ष अभय चंगेडिया, संचालक आनंद अशोक भळगट, तेजकुमार गुंदेचा, गोपाळ कडेल, सच्चिदानंद कुरकुटे, विकास जेधे, विजय मकोने, लक्ष्मण राशीनकर, संध्या जोशी व गुंजन भळगट यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक केली, रकमेचा अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.