बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी,श्रीरामपुरात तरूणाची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन महिला व तिच्या मुलीने वारंवार पैशाची मागणी केली. त्यास कंटाळून तरूणाने रेल्वेखाली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी माय-लेकींना अटक केली. 

Loading...
संतोष अशोक ढोकणे (वय२५, सिद्धार्थनगर) असे मृताचे नाव आहे. सुलताना बाबाखान पठाण (४५, श्रीरामपूर) व मुस्कान बाबाखान पठाण (२०, स्टेशनवाडी, नाशिक रोड) अशी अारोपींची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी संतोषने पँटच्या खिशात पत्र लिहून ठेवले होते. सुलतानाने संतोषशी जबरदस्तीने दोन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते. 

सुलताना व मुस्कान वारंवार पैशांची मागणी करत. संतोषने त्यांना सुमारे चार लाख रूपये दिले, तरीही आणखी एक लाखाची मागणी त्या करत होत्या. त्याने असमर्थता दर्शवल्यानंतर त्याच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांनी दिली. वारंवार होणाऱ्या या जाचास कंटाळून अखेर संतोषने जीवनयात्रा संपवली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.