इच्छुक उमेदवार संदीप भांबरकर यांनी केलेले प्रतिज्ञापत्र शहरात चर्चेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजण्याची शक्यता आहे. त्यातच एका इच्छुक उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्राची भर पडली आहे. प्रभाग 13 मधून ओबीसी प्रवर्गासाठीच्या राखीव जागेवरून निवडणूक लढवू इच्छाणारे संदीप भांबरकर यांनी एक आगळेवेगळी प्रतिज्ञापत्रच सादर केले आहे. त्यानुसार त्यांनी नगरसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे आणि पदावरून हटविण्याचे अधिकारही प्रभागातील समितीला दिले आहेत.


Loading...
भांबरकर यांनी नुकते हे प्रतिज्ञापत्र तयार करून महापालिका निवडणूक अधिकार्‍यांसह राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांनाही पाठविले आहे. यामध्ये भांबकर यांनी म्हटले आहे की, आपण निर्भय नवजीवन फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार निवारणाचे काम करतो. आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून मला निवडणूक लढवायची आहे. 

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नियमांचे पालन करून लोकसेवा करणे अपेक्षित असते, मात्र अनेकदा नगरसेवक याकडे दुर्लक्ष करुन स्वतःच हीत जपतात. त्यामुळे मी स्वतःवर नियंत्रणासाठी हे प्रतिज्ञापत्र करून देत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे काही नियम पाळणे आवश्यक आहे, त्यांचे पालन मी करीनच. मात्र, काही अधिकारी मी माझ्या प्रभागातील नागरिकांना देत आहे. 


काम करताना माझ्याकडून काही चुका झाल्यास किंवा मी कोठे कमी पडल्यास माझे पद रद्द करण्याचा अधिकार मी प्रभागातील जनतेला देत आहे. यासाठी प्रभाग समिती स्थापन करणार आहे. त्यामध्ये 3 ज्येष्ठ नागरिक, त्यामध्ये महिला असेल. याशिवाय तीन तरुणांचाही समावेश असेल. 


या समितीचे अध्यक्ष आयुक्त असतील. प्रभागातील कामासंबंधीचे निर्णय, त्यासाठी ठेकेदार नियुक्ती वगैरे निर्णय ही समिती घेईल. टक्केवारीमुक्त काम करणे हा यामागील हेतू आहे. जेथे टक्केवारीने कामे होतात, तेथे चांगले ठेकेदार काम करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे दर्जेदार कामासाठी हा निर्णय घेत आहे. 


माझा कारभार चांगला नाही, असे वाटले तर हीच समिती मला बहुमाताने निर्णय घेऊन परत बोलावू शकते. याशिवाय प्रशासनालाही काही अधिकार देत आहे. जर मी काही कामे नातेवाईंकाच्या किंवा कार्यकर्त्या नावाने घेतली, माझ्या संपत्तीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आले तर माझे पद रद्द करण्याचा अधिकार प्रशासनाला राहील. 


माझ्या आणि कुटुंबियांच्या बँक खात्यांचा आणि उत्पन्नाचा हिशोब दर सहा महिन्यांनी जाहीर करीत राहील. माझ्या चुकीमुळे पद रद्द होण्याची वेळ आली तर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला पुढे करून निवडणूक लढविणार नाही, अशा अनेक मुद्द्यांचा भांबरकर यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. याची प्रभागात आणि शहरातही चर्चा रंगली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.