सत्यजित तांबेसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदींच्या होर्डिंगला काळं फासल्यानंतर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी आज दिली.  

Loading...
मुंबईत युवक काँग्रेस कार्यकर्ता मनोज डुबे यांची हत्या झाल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांनी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. लोकशाहीत आंदोलनाचे स्वातंत्र्य आहे. मोदी यांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. यासंदर्भात भाजपकडून आम्हास ट्रोलीग व जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. 

तर पोलीसांच सायबर सेल काय करते ?

फेसबुक पोस्ट च्या कारणावरून डुबे यांची हत्या केली गेली. एका पोस्टबद्दल जर हत्या होत असेल तर पोलीसांच सायबर सेल काय करते असा सवाल उपस्थित करत अशाप्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही पण पोलिसांचं सायबर सेल काय कारवाई करतं ? असा सवाल करत एका पोस्टवरुन जर हत्या होत असेल तर भाजपला जिवाची किती किंमत आहे ते कळतं, अशी टीकाही यावेळी केली.

देशात न बोलुंगा, न बोलणे दूंगा !

भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे, मात्र गेल्या चार वर्षात केंद्र आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून न बोलुंगा, न बोलणे दूंगा अशी परिस्थिती आहे. भाजपच्या विरोधात कोणीही व्यक्त झाले तर खून करण्यापर्यंत मजल जाते या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीचा शोध घेऊन अशा गुंडांना कठोर शासन करावे अन्यथा आम्ही या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांना आंदोलनाच्या मार्गाने उत्तर देऊ

भाजपच्या गुंडांनीच केली मनोज दुबे यांची हत्या..

काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे यांची हत्या भाजपच्या गुंडांनी केली आहे अशी आमची खात्री आहे, दुबे यांनी 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार येणार अशी फेसबुक पोस्ट केली होती ती सहन न झाल्याने भाजपच्या गुंडांनी मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली. काँग्रेस कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सत्यजित तांबे यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.