मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कुख्यात गुंडाची मंदिराच्या आवारातच हत्या !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागपूर जिल्ह्यातील चणकापूरमध्ये मंदिराच्या आवारातच एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. पहाटे ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.हत्येची घटना मंदिरात घडल्यामुळे आणि मुंडकेही दुसऱ्या मंदिराजवळ आढळल्यामुळे काही लोक यामागे काही अघोरी कृत्य असण्याची शक्‍यताही व्यक्त करत आहेत.
Loading...

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,चणकापूरमधील प्रसिद्ध हनुमान आणि शनी मंदिराच्या आवारात कुख्यात गुंड अशोक उर्फ गधा पासवानला परिसरातील इतर तीन गुन्हेगारांनी अत्यंत निर्घृणपणे मारले आणि नंतर त्यांचे मुंडके छाटून घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका दुसऱ्या मंदिराच्या जवळ फेकून दिले.


गुंड गधा पासवान रात्री गावातील एका ठिकाणी नामकरणाच्या कार्यक्रमात गेला होता. त्याच कार्यक्रमात खापरखेडा परिसरातील रोहित सूर्यवंशी, आशिष वर्मा आणि सुरज वरणकर हे गुंडही आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हे तिघे गधा पासवानसोबतच बाहेर निघाले होते. त्यामुळे रात्री या सर्व गुन्हेगारांमध्ये कुठल्या तरी कारणाने भांडण होऊन गधा पासवानची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्षात गुंडांच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. दोनच दिवसापूर्वी हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत दिघोरीमध्ये पलाश दिवटे या गुंडाची अभय राऊत या कुख्यात गुंडाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली होती. त्यामुळे नागपुरात पोलिसांची निष्क्रियता आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये सक्रियता असे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
------------------------------
Powered by Blogger.