राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण आणून त्यास आठवले रिपाइं गटाचा पाठिंबा असल्याचे खोटेनाटे भासवत आहेत. असा कांगावा करणाऱ्यांची आम्ही रिपाइं आठवले गटातून हकालपट्टी करू, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. 

Loading...
नाटकी उपोषणाचा कावेबाजपणा !
भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे. या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून नाटकी उपोषणाचा कावेबाजपणा काही मंडळी करत आहेत. रिपाइं आठवले गटाचा पाठिंबा उपोषणाला असल्याचे ते सांगत आहेत. संबंधितांची हकालपट्टी करून त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणू, असेही ते म्हणाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.