मनपाची सूत्रे सत्यजित तांबेच्या हाती.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेस पक्ष नगर महापालिका निवडणूक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. या प्रक्रियेत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाने समन्वयाची जबाबदारी दिली आहे. 
Loading...

विखे व थोरातांच्या नेतृत्वाखाली निवडणूक !
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या टिळक भवनात दोन दिवसांपूर्वी बैठक झाली असून, त्यात विखे व थोरातांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणे व तांबे यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. 

तांबे यांच्यावर समन्वयाची जबाबदारी 
प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी महापालिका निवडणूक विखे व थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढवावी तसेच निवडणुकीत समन्वय साधण्याची जबाबदारी महापालिका निवडणूक पक्षप्रमुख म्हणून सत्यजित तांबे यांच्यावर असल्याचेही स्पष्ट केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.