कोपरगावात आमदार स्नेहलता कोल्हेंशी गैरवर्तन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांचे उपोषण सोडण्याच्यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. त्यानंतर झालेल्या गदारोळात त्यांच्याशी काही कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले.

Loading...

कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांनी सोमवारी सुरू केलेले उपोषण मंगळवारी सायंकाळी प्रशासनाच्या लेखी अाश्वासनानंतर मागे घेतले. प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन काळे व कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले. 

आभार मानू न दिल्याने काळे व कोल्हे समर्थक आमने-सामने
आमदार स्नेहलता कोल्हे यांना उपोषणकर्त्यांचे आभार मानू न दिल्याने काळे व कोल्हे समर्थक आमने-सामने येऊन प्रचंड घोषणाबाजी व राडा झाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत धुमचक्री उडाली. आमदार कोल्हे यांच्यावर उपोषणस्थळ सोडून जाण्याची नामुष्की ओढावली. 

कोल्हेंच्या कार्यकर्त्याना स्टेजवरून खाली ढकलले
उपोषण सोडल्याचे काळेंनी जाहीर केल्यानंतर आमदार कोल्हे यांना बोलायचे होते, परंतु चैताली काळे यांनी माईक हातात घेऊन बोलण्यास सुरूवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आमदार कोल्हे तेथून निघाल्या, काळे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कोल्हेंच्या कार्यकर्त्याना स्टेजवरून खाली ढकलले. भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले. त्यांनी आमदार कोल्हे यांना सुरक्षित बाहेर काढले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.