विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माहेरून पैसे घेऊन ये या कारणाकरीता विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रुपाली अमोल भोकरे (वय २५, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


Loading...
अमोल अविनाश भोकरे, अविनाश रंगनाथ भोकरे, शिवनंदा अविनाश भोकरे (सर्व रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर), अरुंधती हिम्मत टाकळकर (रा. घोटन, ता. शेवगाव, हल्ली मुक्काम पुणे), ज्योती अण्णासाहेब शेवकर (रा. सिन्नर, जिल्हा नाशिक), कल्याणी नितीन उंडे (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) यांनी माहेरून पैसे घेऊन ये या कारणाकरीता वेळोवेळी शारीरीक व मानसिक छळ करून मारहाण केली. 

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेचा भाऊ समजावून सांगण्यास आला असता त्यालादेखील शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली व त्यांच्या बोटाचा चावा घेतला. यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.