शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. मोनिका राजळे गप्प का ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना लोकप्रतिनिधी आ. मोनिका राजळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प का बसल्या आहेत, असा सवाल माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी वडुले बु. ता. शेवगाव येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना उपस्थित केला. विविध विकास कामांचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 


Loading...
वडुले बुद्रुक ते जोरापूर रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन पांडव वस्ती जि.प. शाळा संरक्षण भिंत, गावांतर्गत बंदिस्त गटार योजना, निकाळजे वस्ती काँक्रिटीकरण रस्ता, काते वस्ती, अंगणवाडी पेंव्हिगब्लॉक बसविणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. जि.प. च्या उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील यांच्या विकास निधीतून या कामासाठी मंजुरी देण्यात आली. 

घुले पाटील पुढे म्हणाले, येथून पुढे शेतीसाठी पाणी तर मिळणारच नसून फक्त एक ते दीड महिना पिण्यापुरतेच पाणी शिल्लक आहे. राज्य सरकारचे दुष्काळाबाबत काहीच नियोजन नाही. सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. शेवगाव -पाथर्डी च्या लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाचा निधी परत केला. 


सक्षम लोकप्रतिनिधी असेल तर जिल्हा परिषदेचा संपूर्ण टंचाईचा निधी आपल्या मतदारसंघात आणू शकतो. सन 2012 साली आपण आमदार असताना गाव तेथे छावणी सुरू केली. आ. राजळे यांना दुष्काळाचे राजकारण करायचे आहे. जनतेच्या प्रश्नाबाबत त्यांना काही देणे घेणे नाही. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.