पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघातांत दोघांचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नाशिक-पुणे मार्गावर चंदनापुरी शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. भास्कर राजू राहणे (५५) आणि दिलीप सयाजी राहणे (४५) अशी मृतांची नावे आहेत. 


Loading...
रविवारी सकाळी चंदनापुरीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भास्कर राजू राहणे यांना जोराची धडक बसली. डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे नेण्यात येत होते. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात याच मार्गावर आनंदवाडी शिवारात रविवारी रात्री झाला. अज्ञात वाहनाची धडक बसून दिलीप सयाजी राहणे यांचा मृत्यू झाला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.