कर्जबाजारी शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जबाजारी शेतकऱ्याला दोन वर्षांपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध  (सोमवारी) राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महंमद गफुर सय्यद (वय ५५, रा. दरडगाव तर्फे बेलापूर, ता.राहुरी) असे आत्महत्या कलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Loading...

 बँक व सोसायटीचे कर्ज थकले, व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे, त्यांनी ३० सप्टेंबर २०१६ रोजी राहत्या घरात विषारी औषध घेतले. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. 


दरम्यान, मृत सय्यद यांच्या पत्नी आशाबी यांना घरातील सामानात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात, विनायक गोदरे व रोहीत विनायक गोदरे (दोघे रा. नाशिक रोड, शिखरेवाडी, चैतन्य बिल्डींग, जि. नाशिक) यांना तीस लाख रुपये हात उसने दिले आहेत. परंतु, त्यांनी पैसे परत न देता पाच कोरे धनादेश दिले. त्यामुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख आढळला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.