निवडणूक लढवली तर तुझे हात-पाय तोडेन...शिवसेना नगरसेविकेच्या सासऱ्याकडून इच्छुक उमेदवाराला धमकी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विरोधात कोणी उमेदवारी करू नका असे महिलेस म्हणत निवडून आल्यावर तुमच्या मुलाला व कुटुंबियांना जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या सासऱ्याने एका इच्छुक उमेदवारास जीवे मारण्याची धमकी दिली. मनसेचे माजी जिल्हा सचिव नितीन भुतारे असे या इच्छुक उमेदवाराचे नाव अाहे.


Loading...

गेल्या निवडणुकीत नगरसेविका सुवर्णा जाधव व भुतारे यांनी मनसेच्या तिकिटावर एकाच पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. जाधव यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असून त्या प्रभाग १५ मधूनच निवडणूक लढवणार आहेत.

कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी !
अलका दत्तात्रय भुतारे (रा. आनंदनगर स्टेशनरोड) या त्यांच्या फुलविक्रीच्या दुकानात असताना संजय जाधव हा तेथे आला व त्याने भुतारे यांना तुमच्या मुलास समजावून सांगा असे म्हणत पक्षाच्या विरोधात घरातील कोणी उमेदवारी केल्यास तसेच आमच्या विरोधात भाषण केल्यास निवडून आल्यावर तुमचा मुलगा नितीन भुतारे व कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली आहे.

शिवसेनेच्या विरोधात कोणीच उमेदवारी करायची नाही.!
शिवसेनेच्या विरोधात तुमच्या घरातील कोणीच उमेदवारी करायची नाही. या भागात कोणताही कार्यक्रम करायचा नाही, आमच्या विरोधात भाषण करायचे नाही, नाहीतर निवडून आल्यावर तुमचा मुलगा नितीन याचे हातपाय तोडून त्याला जीवे मारून टाकू. तुमच्या कुटुंबाला देखील राहू देणार नाही, अशी धमकी संजय जाधव यांनी दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.