धक्कादायक ! पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह गळफास घेवून शेतकर्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्ज बाजारीपणामुळे अकोले तालुक्यातील चास गावातील एका तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आल्यानंतर शोककळा पसरली.
Loading...

एकाच कुटुंबात तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याच्या या  बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नवरा आणि बायकोने 2 वर्षाच्या चिमुरडीलाही गळफास लावून आत्महत्या केली आहे. अवघ्या 2 वर्षाच्या चिमुरडीला गळफास लावताना या माता-पित्यांचं हात सरसावलेच कसे असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

पांडूरंग राधू शेळके वय 31 तर पत्नी सोनाली शेळके वय 22 असं या जोडप्याचं नाव आहे. या दोघांनी त्यांची मुलगी शिवन्यासह स्वत:लाही गळफास लावून घेतला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


पांडूरंग यांचे मित्र रात्री त्यांच्या घरी दूध आणण्यासाठी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. ते घरात गेले आणि त्यांनी या तिघांचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिले. यानंतर याबद्दल पोलिसांना सांगण्यात आलं.


सेवा सोसायटीचे असलेले कर्ज,शेतीमालाला नसलेला बाजारभाव यामुळे कदाचित मयत पांडुरंगने हे पाऊल उचलले अशी चर्चा लोकांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती.अकोले पोलिसांनी झालेल्या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.