वृद्ध आईला मुलाने दिली जीवे मारण्याची धमकी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वयोवृद्ध आईला संभाळण्याऐवजी पोटच्या मुलाकडून तिचा मानसिक, शारीरिक छळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. केडगाव येथील ज्येष्ठ महिला सुमन अशोक पाचारणे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी तिचा मुलगा ईश्‍वर याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
Loading...

गेल्या काही दिवसांपासून ईश्‍वर हा आईला त्रास देत आहे. मानसिक छळ करत आहेत. अतिरीक्त घरगुती कामासाठी त्रास देत आहे. यातून शारीरिक व्याधी वाढल्या आहेत. वृद्ध अवस्थेत असताना संभाळण्याची जबाबदारी घेत नाही. पालनपोषण करत नाही.

छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्रास देत आहे. मारहाण करत आहे. शिवीगाळ करतो. जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सुमन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.