पुण्याची जागा मिळण्यासाठी नगरच्या जागेवर आ.अरुण जगताप यांचे नाव जाहीर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  डॉ. सुजय विखे हेच नगर दक्षिणेतून उमेदवार राहतील, असा दावा आ. शिवाजी कर्डिले यांनी करतानाच, नामदार विखेंनी काँग्रेसमध्येच रहावे..डॉ. सुजय विखे यांनी भाजपात यावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ.सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

Loading...
शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत त्यांनी पुण्याची जागा मिळण्यासाठी नगरच्या जागेवर आमदार अरुण जगताप यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र जगताप यांना राष्ट्रवादी तिकीट देणार नाही. याची खात्री असल्याचेही ते म्हणाले. राधाकृष्ण विखे यांना लोणीतच राहू द्या, तुम्ही विळद घाटात बंगला बांधून नगर दक्षिणचे प्रतिनिधत्व करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.