खुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे केडगाव येथील पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खुनाच्या सूत्रधार माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर याच आहेत. त्यांचे मोबाईलवरील संभाषण उपलब्ध असताना त्यांना अटक का केली जात नाही, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. 


Loading...
या प्रकरणातील आमदारांचे जामीन रद्द केले नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेच्या महामेळाव्यात बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि कॉंग्रेसला गुंडगिरी करणारे पक्ष ठरविले. नगरची पोलीस यंत्रणा हे तीन पक्ष चालवित असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आ. संग्राम जगताप मुक्त वातावरणात फिरत आहेत, असे निदर्शनास आणून महाराष्ट्र हा काय बिहार झाला का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचा दबाव असल्याचा साक्षात्कार येथील पोलीस अधिकाऱ्यांना कसा होतो 


आणि पोलिसांचे त्याबाबतचे पत्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कसे मिळते, असा सवाल करून डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. 


दोन आमदारांना केडगावच्या गुन्ह्यात जामीन मिळतो. त्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अपील का केले नाही, असा सवाल उपस्थित करून डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीच्या तपासावरही प्रश्‍नचिन्ह लावले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.