मराठा समाजाने आरक्षणाचा नाद सोडा ! नितीन गडकरी यांचे आवाहन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मी ब्राम्हण असल्याने आम्हाला आरक्षण नव्हते हे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहेत. बँकेत नोकरी कर म्हणून माझी आई नेहमी पाठिशी लागायची. पण, मला नोकरी मागणारा नाही तर रोजगार देणारा व्हायचे होते. मराठा समाजाने आपली जुनी संपन्नता ओळखून रोजगार, नोकरी देणारे व्यक्ती निर्माण करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.

Loading...
मराठा महासंघाचे 'मराठा जागर' अधिवेशन नागपूर शहर मराठा महासंघ व मराठा समाज कृती समितीच्या वतीने रेशिमबाग येथील जैन कला समाज भवनात रविवारी एकदिवसीय 'मराठा जागर' अधिवेशन घेण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून गडकरी बोलत होते. 

गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत, हे आमचे भाग्य आहे. त्यांचा आदर्श घेऊन संपूर्ण हिंदुस्थान आपणास घडवायचा आहे. रोगाचे निदान झाले की योग्य औषधोपचार देऊन उपचार करता येतात. त्याचप्रमाणे मराठा समाजाने, किंबहुना प्रत्येकच समाजाने आपल्या समस्यांचे मूळ शोधण्याची गरज आहे. 

तुम्हाला तुमच्या विकासाचा मार्ग स्वत:च शोधावा लागणार आहे. नोकरी आणि रोजगार या वेगळ्या संकल्पना आहेत. मराठा समाजाने उद्यमशिलता वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणे, अपेक्षित आहे. उद्यमशिलता वाढवून नोकरी देणारे व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.