नेवासा तालुक्यातील बँक ऑफ बडोदाच्या दहा लाख रुपयांच्या नोटा जाळल्या !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बँकेतील 10 लाख रुपयांच्या चलनी नोटा स्वतः जाळून टाकून, त्या शॉर्टसर्किटने जळाल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शाखेत 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Loading...

याप्रकरणी बँकेतील रोखपाल रमेश बाजीराव वाघ (रा. साईसिटी, नेवासा फाटा, नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघ हा बँक ऑफ बडोदाच्या सलाबतपूर शाखेत रोखपाल म्हणून काम करतो. त्याने बँकेतील 10 लाख 12 हजार 435 रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा स्वतः जाळून टाकल्या. 


परंतु, त्या नोटा विद्युत शॉर्टसर्किट होऊन जळून गेल्याचा बहाणा केला. बँकेचे नुकसान करण्याच्या हेतून रोखलपालाने हा प्रकार केला.नेवासा पोलिस ठाण्यात रोखपाल रमेश वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.