पारनेर तालुक्यातील युवकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील लहू पोपट चौधरी या युवकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. तालुक्यात या आजाराचा पहिला बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तरुणामागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. 

Loading...
लहू २२ सप्टेंबरला पुण्यात भरतीकरिता गेला होता. परत आल्यानंतर थंडी-तापाचा त्रास होऊन अशक्तपणा जाणवू लागल्याने त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. चार-पाच दिवसांनंतरही ताप कमी न झाल्याने त्याला नगरला पाठवण्यात आले. उपचारादरम्यान स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले, परंतु तोपर्यंत प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुण्याला हलवण्यात आले. २० ऑक्टोबरला त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.