कलाकेंद्रातच गळफास घेवून कामगाराची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील मोहा येथील घुंगरू कलाकेंद्रात दीपक केशव बांगर (वय ४५, रा. सेलू, तालुका,जिल्हा परभणी) या सफाई कामगाराने स्टेजवरील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Loading...

मयत दिपक बांगर हा काही दिवसांपुर्वीच जामखेड येथील घुंगरू कलाकेंद्रात कामानिमित्त आला होता. मात्र, आल्यापासूनच तो कसल्या तरी तणावाखाली रहात होता. 


शनिवारी (२० ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच घुंगरू कलाकेंद्रातील नर्तिका नृत्य काम करत असलेल्या मात्र, सध्या वापरात नसलेल्या स्टेजवरील पत्र्याच्या अँगलला दिपक बांगर याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे स्टेज वापरात नसल्याने सदरची घटना उशीर लक्षात आली. तोपर्यंत बांगर याचा मृत्यू झाला होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.