विरोधीपक्षनेत्यांच्या मतदारसंघात गुंडांचा धुडगूस; पोलिसालाही शिवीगाळ करत मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गुंडांच्या टोळीने देशी दारूचे दुकान लुटले. नंतर शिवाजी चौकात एका युवकावर तलवार व चाकूने हल्ला केला. दोघांना ताब्यात घेतल्यावर या गुंडानी एका पोलिसालाही मारहाण केली. महिला पोलिसास शिवीगाळ करुन धिंगाणा घातला. याप्रकरणी दोन महिलांसह चाैघांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. 
Loading...

पहिली घटना शनिवारी सायंकाळी चितळी रस्त्यावरील भातोडे यांच्या सरकारमान्य दारू दुकानात झाली. संदीप काकडे व त्याच्या तीन साथीदारांनी दारू मागितली. ती न दिल्याने त्यांनी चालक महेंद्र रेड्डी यास धमकावत गल्ल्यातील आठ हजार पाचशे रूपये लांबवले. 

तर दुसरी घटना रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौकात घडली. आरोपींनी तलवार चाकू घेऊन हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यास मारहाण केली. गर्दीतील तरूणांनाही मारहाण केली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच या टोळक्याने पळ काढला. 

पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडून नेले. तेथे एकाने पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली. महिला पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की करत सरकारी मालमत्तेचे नुकसान करुन वरिष्ट अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकीही दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.