पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पैशासाठी मुलीला फेकले पाण्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुलीच होतात म्हणून पत्नीशी अनैसर्गिक अत्याचार केला. हुड्यांसाठी पत्नीचा छळ करून मुलीला पाण्याच्या टाकीत फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. 

Loading...
पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्याकडील आठ जणांविरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

पत्नीने माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी तिचा सासरच्यांनी वारंवार छळ केला. पैशासाठी उपाशी ठेवत मारहाण केली. मुलीच होतात म्हणून पत्नाची पती छळ करत राहिला. पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला.

या दाम्पत्याला दीड वर्षाची मुलगी आहे. तिला पाण्याच्या टाकीत फेकून देत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सासरे आणि दीराने मिळून दीड वर्षाच्या मुलीला मारण्याचा प्रकार केल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.