श्रीगोंद्यात बांधाच्या वादातून सहा जणांना तलवारीने मारहाण,घर पेटवले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील कौठा (शिपलकरवाडी) येथे जमिनीच्या बांधावरून सहा जणांना तलवारीने मारहाण करून राहते घरही पेटवून दिले. याप्रकरणी शुक्रवारी १४ जणांवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील भीमानदी काठी कौठा शिपलकरवाडी येथे बुधवारी (१७ आॅक्टोबर) रावसाहेब बाबा बनकर यांनी आरोपींना माझ्या शेतातील बांध का कोरला म्हणून विचारले. याचा राग मनात धरून बुधवारी सकाळी ७.३० वाजता आरोपी यांनी तलवार, गज, काठी, सत्तूर, विळा घेऊन विचारणा करणारे रावसाहेब बाबा बनकर यांच्या डोक्यात तलवारीचे वार करून लोखंडी गजाने पायावर वार करून जखमी केले. 
Loading...

प्रतिकार करायला आलेल्या बाबा मारुती बनकर (४०), उषा मारुती बनकर (३६), कल्पना भाऊसाहेब बनकर (४२), अलका रावसाहेब बनकर (४०) व आकाश भाऊसाहेब बनकर (१५) यांनाही चौदा जणांनी मारहाण केली. आमच्यावर गुन्हा दाखल का केला याचा राग मनात धरून पुन्हा शनिवारी (२० आॅक्टोबर) पहाटे बनकर कुटुबांचे घर आरोपींनी पेटवून दिले. 

त्यात बाबा नामदेव बनकर (७०) व बबई बाबा बनकर (६६) हे जखमी झाले. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून गेले. पण चार दिवस उलटून सुध्दा राजकीय दबावामुळे पोलिस कारवाई करत नाही. घटनेचा पुढील तपास श्रीगोंदे पोलिस करीत आहेत.
हे आहेत आरोपी.
माजी सभापती अनिता विठ्ठल शिंदे, माजी सभापती पती विठ्ठल ज्ञानदेव शिंदे, गणेश विठ्ठल शिंदे, सुभाष ज्ञानदेव शिंदे, गोविंद प्रभाकर शिंदे, प्रभाकर बाबुराव शिंदे, रुपाली गणेश शिंदे, शोभा सुभाष शिंदे, सुनील प्रभाकर शिंदे, पायल विठ्ठल शिंदे, राजेंद्र झुंबर शिंदे, मनीषा गोविंद शिंदे, संजय झुंबर शिंदे आणि मनीषा बनकर.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.