महाराष्‍ट्राचे पुढील मुख्‍यमंत्री हे ना.राधाकृष्‍ण विखे पाटील हेच होणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली जास्‍तीत जास्‍त विकासकामे केली. आपल्‍या मतदार संघात शासन आपल्‍या दारी या योजनेतून रेशन कार्ड मिळवून देण्‍याचा दिलेला शब्‍द पुर्णत्‍वास जात असल्‍याचे मोठे समाधान आहे. रेशनकार्ड मिळवून देण्‍याचा उपक्रम यशस्‍वी करणारा शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्‍यात एकमेव आहे याचा अभिमान वाटत असल्‍याचे सांगतानाच केवळ मतांसाठी नव्‍हे तर लोकांच्‍या प्रश्‍नांसाठी आम्‍ही काम करतो असे प्रतिपादन चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
Loading...

कोल्‍हार येथे शासन आपल्‍या दारी या योजनेअंतर्गत रेशनकार्ड वाटप, अपघाती विमा, घरकुल योजना, नुकसानग्रस्‍त शेतक-यांचे अनुदान वाटप कार्यक्रम डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, येत्‍या २०१९ च्‍या होणा-या निवडणुकीत भाजप शिवसेनेचे सरकार जाणार आणि कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्‍तेत येणार असून, महाराष्‍ट्राचा पुढील मुख्‍यमंत्री हे ना.राधाकृष्‍ण विखे पाटील हेच होणार असे भाकीतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्‍य डॉ.भास्‍करराव खर्डे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍याया कार्यक्रमास पंचायत समितीच्‍या सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बबलू म्‍हस्‍के, जिल्‍हा परिषद सदस्‍य दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्‍य भारत अंत्रे, माजी सरपंच अॅड.सुरेंद्र खर्डे, सयाजी खर्डे, प्रवरा बॅंकेचे व्‍हा.चेअरमन अशोक असावा, भगवतीपूरचे सरंपच रावसाहेब खर्डे, कोल्‍हार बु चे उपसरपंच ज्ञानेश्‍वर खर्डे,कारखान्‍याचे संचालक राजेंद्र खर्डे, विजय खर्डे,श्रीकांत खर्डे, स्‍वप्‍नील निबे, भाऊसाहेब कडू, संभाजी देवकर आदींसह ग्रामस्‍थ लाभार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, भाजप सरकार हे लबाड सरकार आहे. केवळ भाषणबाजी करणे, खोटी आश्‍वासने देणे, लोकांना फसविणे, विकासाचे व्‍हीजन नसलेल्‍यांना तुम्‍ही पुन्‍हा सरकारमध्‍ये बसविणार का? असा सवाल उपस्थित उपस्थित करुन राज्‍यात दुष्‍काळी परिस्थितीसह शेतक-यांचे प्रश्‍न गंभिर झालेले आहेत. सरकार अजुनही दुष्‍काळ जाहीर करायला तयार नाही. सत्‍तेत बसलेली ही माणसे फक्‍त मतांच्‍या स्‍वार्थाकरीता तुमच्‍याकडे आली होती अशी टिका करुन डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, आम्‍ही कधीही मतांसाठी असा स्‍वार्थीपणा केला नाही. लोकांच्‍या प्रश्‍नांसाठी रात्रंदिवस पाठपुरावा करीत असतो. सामान्‍यांच्‍या सुख दुख्‍खात सहभागी होतो. म्‍हणुनच जनतेचे पाठबळ आम्‍हाला मिळते असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून रेशनकार्ड मिळवुन देण्‍यासाठी आपण कालबध्‍द कार्यक्रम हाती घेतला होता. गावागावात कॅम्‍प लावुन रेशनकार्डच्‍या समस्‍या नोंदवुन घेतल्‍या आणि त्‍या सरकार दरबारी पाठविल्‍या. आज या उपक्रमाचे यश समोर आले आहे. वर्षांनुवर्षे रेशन कार्ड न मिळालेल्‍या सामान्य नागरीकांना रेशनकार्ड मिळवून दिल्‍याचा आनंद हा खुप मोठा आहे. 


राज्‍यात हा उपक्रम यशस्‍वी करणारा शिर्डी मतदार संघ हा एकमेव ठरला आहे असे सांगतानाच यापुर्वीही मोफत अपघात विमा योजना, उज्‍वला गॅस योजना, आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या कुटूंबियांना दत्‍तक घेण्‍याची योजना असेल. हे सारे उपक्रम आपल्‍या मतदार संघात आपण यशस्‍वी केले. विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु असलेली ही विकासात्‍मक वाटचाल अधिक गतीने पुढे नेण्‍यासाठी आपल्‍या सर्वांना कटीबध्‍द व्‍हावे लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.