उद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार ? या चार नेत्याची नावे चर्चेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या नगर जिल्ह्यात येत आहेत. शिर्डी व नगरमध्ये त्यांच्या जंगी सभा होणार आहेत. ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. 
Loading...

त्यासाठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची सुरूवात नगर जिल्ह्यातील शिर्डी व नगर येथून होत आहे. महाराष्ट्र दौर्‍याची त्यांची पहिली सभा शिर्डी येथे सकाळी 11 वाजता होत आहे. त्यानंतर दुसरी सभा नगरमध्ये दुपारी 1 वाजता होणार आहे. 

सदाशिव लोखंडे यांच्या रूपाने शिर्डीत शिवसेनेचा खासदार आहे. ही जागा पुन्हा खेचून आणण्याचे शिवसेनेेचे प्रयत्न आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा पूर्वी भाजप- शिवसेना युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे होती. नंतरच्या काळात ती भाजपला सोडण्यात आली. त्याबदल्यात शिर्डीची जागा शिवसेनेने घेतली होती

आता येथे शिवसेना उमेदवार देणार असून या मतदारसंघातून उपनेते अनिल राठोड, पारनेरचे आमदार विजय औटी, घनशाम शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नावाची चर्चा आहे. ठाकरे यावेळी या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.