शिवसेना कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून देते.- पालकमंत्री


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे. त्यामुळेच भाजपमध्ये मनपा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. दिगंबर ढवण यांना जनतेच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेने सहकार्य केले नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे हे शेवटच्या घटकातील शिवसैनिकाच्या कामासाठी धावून जायचे. परंतु आताची शिवसेनाही कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून देते. सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्नक सोडवावे लागतात, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी केले.
Loading...

शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण, जिल्हा उपप्रमुख दिगंबर ढवण व संदीप कुलकर्णी यांनी समर्थकांसह पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे व खा. दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी ना. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नगरसेवक ऍड. अभय आगरकर, गटनेते सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, स्वप्नील शिंदे, नितीन शेलार, बाबासाहेब सानप, अशोक कानडे, शिवाजी कराळे, रामदास आंधळे, श्रीराम येंडे आदि उपस्थित होते.

खा. दिलीप गांधी म्हणाले की, दिगंबर ढवण यांनी जनतेच्या प्रश्नागसाठी विविध आंदोलने,उपोषणे करून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. आता दिगंबर ढवण यांना आंदोलने, उपोषण करण्याची गरज भासणार नाही. भाजपाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्नउ सोडविले जातील. 

शहरात नळाद्वारे पाणी देण्याऐवजी टँकरने पाणीपुरवठा देण्याचे पाप होत आहे. यात मोट्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. संघर्षातून कार्यकर्ता निर्माण होतो. भाजपाच्या माध्यमातून नगर शहराचे प्रश्न सोडविण्याचे काम चालू आहे. नगरकरांनी विकासासाठी भाजपाला साथ द्यावी. शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आज अखेर आपण यशस्वी झालो, याचे समाधान आहे, असे ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.