भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ नागरिक अडगळ नसून, कुटुंबाचे आधारवड आहे. त्यांचा मान सन्मान करणे प्रत्येकाचे उत्तरदायित्व असून, ज्येष्ठांचे मार्गदर्शन जीवनासाठी उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले. तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मारुती मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सुभाषचंद्र पाटील, युवकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सिध्दार्थ आढाव, सुभाष होडगे, विलास निरवणे, हंगारके सर, शरदराव पतंगे, सुदाम गांधले, राधेलाल नकवाल, मतीन ठाकरे, सदाशिव मांढरे, शकिल शेख, सतीश सपकाळ, केशव रासकर आदि उपस्थित होते. राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक करुन आभार मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.