सुजित झावरे व आ.विजय औटी पडले तोंडघशी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी बोलविलेल्या सभेला गायकवाड वगळता एकही संचालक हजर न राहिल्याने गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला. 

Loading...
गेल्या पंधरा दिवसांपासुन पारनेर तालुक्‍यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या अविश्‍वास ठराव सुजित झावरे व आ.विजय ओटी यांच्या तोडघशी पडला. अविश्वास ठराव बारगळल्यामुळे तालुक्यात आमदार औटी व सुजित झावरे यांची सहमती एक्स्प्रेसही अडचणीत आली आहे.
बाजार समितीच्या १२ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ सप्टेंबर रोजी अविश्वास ठरावाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या. सभापतींवर अविश्वासाचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे यांच्यापर्यंत बाजार समितीचा हा विषय गेल्याने या अविश्वास ठरावाबाबत पक्षीय पातळीवरही हलचाली झाल्या. 

सभापती गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अण्णा बढे, सोपान कावरे, खंडू भाईक, काँग्रेसचे विलास झावरे, संगीता कावरे, शिवसेनेचे शिवाजी बेलकर, सावकार बुचुडे, लंके गटातील राजश्री शिंदे हे नऊ संचालक असल्याने अविश्वास ठराव पारित होण्यासाठी असणारा १२ संचालकांचा आकडा झावरे गटाकडे न राहिल्याने त्या गटाच्या संचालकांनी अविश्वास ठरावाला हजेरी लावली नाही. त्यामुळे सोमवारी बोलावण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस सभापती गायकवाड यांच्या व्यतिरिक्त एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, जि. प. माजी सदस्य मधुकर उचाळे, महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नीलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, वसंत चेडे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार आदींनी गायकवाड यांचे अभिनंदन केले. 

दरम्यान, हा अविश्वास ठराव बारगळल्यामुळे अनेक दिवस सुरू असणारी आमदार औटी-झावरे युती जनतेसमोर उघड झाली अाहे. यामुळे या दोघांची सहमती एक्स्प्रेसही आता अडचणीत आली आहे.

सुजित झावरे यांनी आमदार विजय औटी यांच्या मदतीने सभापती गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. परंतु वरिष्ठ पातळीवर हा विषय गेल्याने वरिष्ठांचा दबाव व झावरे यांच्या विरोधातील तालुक्यातील राष्ट्रवादी नाराज गटांनी केलेल्या तक्रारी, बाजार समिती संचालकांची पळवापळव या घडामोडीनंतर सभापती गायकवाड यांनी नियोजनबद्ध खेळीपुढे आमदार औटी व झावरे यांची सहमती एक्स्प्रेस टिकाव धरू शकली नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.