नगर-आैरंगाबाद रोडवरील अपघातात ३ ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-आैरंगाबाद रोडवरील पांढरीपूल (ता.नेवासे) येथे भरघाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिआेने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहे. हा अपघात सोमवार (१ आॅक्टोबर) ला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झाला. पाथर्डीहून कायगाव टोका येथे जाणारी एमएच १६ बीझेड २२५२ या स्काॅर्पिआेने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात गाडातील उज्ज्वला गोरे, अनिता गोरे व नीलेश गोरे (रा. घारवाडी,पाथर्डी) हे तीन जण ठार झाले आहेत.
Loading...

कायगाव टोका येथे एका नातेवाइकाच्या दशक्रिया विधीला जाण्यासाठी सोमवारी सकाळी धारवाडी येथून स्कॉर्पिओ जीपमधून हे सर्वजण निघाले होते. मिरी मार्गे पांढरीपूल येथून पुढे जात असताना हॉटेल निलकमलजवळ भरधाव जीप रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली. जीपने अनेक पलट्या खाल्याने त्यामधील सहा जण गंभीर जखमी झाले.त्यातील तिघांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या.

पांढरीपूल येथील नागरिकांनी जखमींना जीपमधून काढून अॅम्ब्युलन्समधून नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर तिघा जणांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.