बायको प्रियकरासोबत पळाली,अपमानामुळे नवर्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बायकोने प्रियकरासोबत पलायन केल्याने अपमानित झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या धारवंटा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
Loading...

गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील हरिभाऊ लक्ष्मण पुरी (४०) हे १५ ऑक्टोबर रोजी पत्नी सुनीतासह गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त सुरु असलेल्या त्वरितादेवीच्या यात्रेसाठी गेले होते. देवीचे दर्शन घेेऊन येत असताना हरिभाऊ यांची नजर चुकवून पत्नी सुनीता हिने प्रियकरासोबत पळ काढला.

पत्नी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिभाऊ यांनी यात्रेत सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. काही काळ लोटल्यानंतर पत्नी तिचा प्रियकर असलेल्या रामचंद्र वारुळे या युवकासोबत ती पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

बायकोने प्रियकरासोबत पळ काढल्याने अपमानित वाटल्याने पतीने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी बाबू पुरी यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.