जामखेड शहरात गळफास घेवून युवकाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड शहरातील कर्जतरोड परिसरात राहणाऱ्या योगेश अशोक घायतडक (वय 24) या तरूणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसुन यामागच्या कारणांचा जामखेड पोलीस शोध घेत आहेत. 

Loading...
या घटनेने जामखेड शहरात खळबळ उडाली आहे. दि.30 रोजी दुपारी साडेचार वाजता उघडकीस आली. सचिन भानुदास घायतडक (वय 34 ) रा कर्जत रोड जामखेड याने जामखेड पोलीस स्टेशनला घटनेची खबर देताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

पोलीसांनी मयत योगेशचा मृतदेह ताब्यात घेत जामखेड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी पोस्टमार्टम केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक बडे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.